सरकारी नोकरी करायची आहे ?
सरकारी नोकरी करायचीय ?
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनिअर सेक्रेटरीयेट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट व लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी भरती केली जाते. यासाठी कम्बाइंड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन २०१७ ची जाहिरात प्रकाशित झाली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनिअर सेक्रेटरीयेट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट व लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी भरती केली जाते. यासाठी कम्बाइंड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन २०१७ ची जाहिरात प्रकाशित झाली आहे. वरील पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना काही वर्षांनी विभागीय परीक्षा देऊन उच्च पदावर अधिकारी म्हणूनही कामाच्या संधी उपलब्ध होतात.
शैक्षणिक पात्रता :-
मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी परंतु नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग)मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी बारावी विज्ञानशाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :-
१८ ते २७ वर्षं.
प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत: १८ डिसेंबर, २०१७

परीक्षा फी :-
१०० रुपये (महिला तसंच एस.सी., एस.टी. व अपंग उमेदवारांना फी नाही)

परीक्षा दिनांक :- ४ मार्च व २६ मार्च, २०१८
विद्यार्थी प्रवेश अर्ज संबंधित विभागीय ऑफिसमध्ये अर्ज पाठवू शकतात किंवा ऑनलाइन अर्ज भरू शकतात. परीक्षेसाठी केवळ एकच अर्ज पाठवावा. महाराष्ट्राचे विभागीय केंद्र मुंबई येथे असून परीक्षा केंद्रे औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे, भंडारा, अकोला, चंद्रपूर, जळगाव, नांदेड, अहमदनगर, अलिबाग, अमरावती येथे आहेत.
निवड प्रक्रिया :-
उमेदवारांची निवड संगणकावरील ऑन स्क्रीन टेस्ट (टिअर १), वर्णनात्मक पेपर (टिअर २), स्कील टेस्ट (डेटा एंट्री ऑपरेटरसाठी), टायपिंग टेस्ट (लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी) द्वारे केली जाते.
संगणकावरील ऑन स्क्रीन टेस्ट ( टिअर १)
लेखी परीक्षा २०० गुणांची असून प्रश्नपत्रिकेचे स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. कालावधी एक तासाचा असतो. प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध असतील. लेखी परीक्षेत चार विषयांवर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. चुकीच्या उत्तरासाठी अर्धा गुण वजा केला जातो.

विषय :-
१. सामान्य बुध्दीमापन
२. इंग्रजी भाषा
३. क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्युड
४. सामान्य ज्ञान
१. सामान्य बुध्दीमापन
२. इंग्रजी भाषा
३. क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्युड
४. सामान्य ज्ञान
वर्णनात्मक पेपर (टिअर २) :-
या पेपरमधून उमेदवाराचे सरकारी नोकरीसाठी आवश्यक लेखन कौशल्य तपासलं जातं. प्रश्नपत्रिका १०० गुणांची असून ऑफलाइन (पेपर-पेन) स्वरूपाची असते. यामध्ये दिलेल्या विषयावर २०० ते २५० शब्दांमध्ये निबंध लिहिणं तसंच १५० ते २०० शब्दांमध्ये पत्र वा अर्ज लिहिणं आदी विषयांचा समावेश असतो. या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना या पेपरचे गुण ग्राह्य धरले जातात. ही प्रश्नपत्रिका उमेदवार हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून सोडवू शकतात.

स्कील टेस्ट :-
डेटा एंट्री ऑपरेटरसाठी स्कील टेस्ट घेतली जाते. लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना स्कील टेस्टसाठी बोलावलं जातं. स्कील टेस्टमध्ये १५ मिनिटे इंग्रजी भाषेत टायपिंग करायला सांगितलं जातं. टायपिंगचा वेग तासाला ८००० की डिप्रेशन इतका असणं आवश्यक आहे. कॅग ऑफिसमधील डेटा ऑपरेटरसाठी टायपिंगचा वेग १५००० की डिप्रेशन प्रति तास असणं आवश्यक आहे. या टेस्टमध्ये केवळ उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. यासाठी वेगळे गुण दिले जात नाहीत.

टायपिंग टेस्ट :-
लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना टायपिंगच्या परीक्षेसाठी बोलावलं जातं. टायपिंग टेस्ट हिंदी किंवा इंग्रजी भाषेत घेतली जाते. इंग्रजी भाषेतील टायपिंगचा वेग ३५ शब्द प्रती मिनिट तर हिंदी भाषेतील टायपिंगचा वेग ३० शब्द प्रती मिनिट इतका असणं आवश्यक आहे. टायपिंगची परीक्षा संगणकावर घेतली जाते यामध्ये १० मिनिटे दिलेल्या उताऱ्याचं टायपिंग करायचं असतं.
या परीक्षेच्या अधिक माहितीसाठी http://ssc.nic.in ही वेबसाइट पहावी.
ऑनलाइन अर्ज पुढील वेबसाईटवरुन भरता येईल. http://www.ssconline.nic.in

No comments