रेल्वेत ITI आणि इंजीनियर 63 हजार पदांसाठी महाभरती...

रेल्वेत 63 हजार पदांसाठी महाभरती...

अनेकांसाठी सरकारी नोकरी मिळवणं हेच त्यांच्या आयुष्याचं मोठ ध्येय वाटतं. मात्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उच्च शिक्षित आणि अनेक परीक्षा पार कराव्या लागतात असे अनेकांना वाटते. सरकारने नुकतीच भारतीय रेल्वेतील सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये सुमारे 62,907 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 


 ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन   

 रेल्वेकडून मागवण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. ही प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2018 ला सकाळी 10 वाजल्यापासून सुरूवात करणार आहेत. या पदासाठी 12 मार्च 2018 रोजी रात्री 11.59 पर्यंत सुरू राहणार आहे. या भरतीबाबतची अधिक माहिती (www.indianrailways.gov.in)वर देण्यात आली आहे.  

कोणत्या पदांसाठी भरती ? 

ट्रॅक मेंटेनर
गेटमॅन
प्वाइंटमॅन
हेल्पर (इलेक्ट्रिकल/ मेकेनिकल/ इंजीनियरिंग/ सिग्नल एन्ड टेलीकम्युनिकेशन डिपार्टमेंट)


शैक्षणिक पात्रता 

उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
मान्यता प्राप्त संस्थेतून NCVT/SCVT कडून आईटीआई असणं आवश्यक,
सोबतच NCVT कडून अप्रेंटिस सर्टिफिकेट मिळवलेले उमेदवार असावा.

वयोमर्यादा 

कमीत कमी 18 आणि कमाल 31 वर्ष   
आरक्षण असलेल्यांना उमेदवारांना नियमानुसार सूट देण्यात आली आहे. 
ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट आहे.
एसी आणि एसटी वर्गातील मुलांना पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. 


शुल्क किती ?

सामान्य आणि ओबीसी वर्गातील उमेदावारांना 500 रूपये तर एससी आणि एसटी उमेदवारांना 250 रूपये अर्जासाठी भरावे लागणार आहेत. 

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन स्रुरू होणार :
10 फेब्रुवारी 2018 (सकाळी 10 वाजल्यापासून)

ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशनची अंतिम तारीख :
 
12 मार्च 2018 (रात्री 11:55 वाजेपर्यत )
नेट बैंकिंग/ क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड ने फी भरण्याची अंतिम तारीख : 
12 मार्च 2018 (रात्री 10 वाजेपर्यंत ) 

एसबीआई/ पोस्ट ऑफिस चलानने फी भरण्याची अंतिम तारीख : 
12 मार्च 2018  दुपारी 1 वाजेपर्यंत.

एसबीआई चालानने फी भरण्याची अंतिम तारीख :
12 मार्च2018  दुपारी 1 वाजेपर्यंत.

अधिक माहितीसाठी आपल्या ब्लॉगला भेट द्या. 

No comments

Powered by Blogger.