आपली 'मुंबई' जगातील पहिल्या १५ श्रीमंत शहरात.....
जगातील पहिल्या १५ श्रीमंत शहरांमध्ये भारताची आर्थिक राजधानी 'मुंबई'चाही समावेश आहे.
जगातील सर्वात श्रीमंत देशाबरोबरचं सगळ्यात श्रीमंत शहरं कोणतं ? याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यात आता मुंबईकरांनी बाजी मारली आहे. जगातील पहिल्या १५ श्रीमंत शहरांमध्ये भारताची आर्थिक राजधानी 'मुंबई'चाही समावेश आहे. मुंबईची एकूण संपत्ती ९५० अब्ज डॉलर्स साधारण ६१ लाख कोटी रुपये एवढी आहे.
जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत ३ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे १९३ लाख कोटी) संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे 'न्यू यॉर्क शहर'.
'न्यू वर्ल्ड वेल्थ' या संस्थेच्या अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. हा अहवाल तयार करताना, कोणत्याही शहराच्या एकूण संपत्तीत त्या शहरातील लोकांच्या वैयक्तिक कमाईचा समावेश केला गेला आहे. यात सरकारी निधी समाविष्ट करण्यात आलेला नाही.
मुंबईत संपत्ती तर जास्त आहे. पण इथे राहणाऱ्या मुंबईकरांचं आरोग्य, मुंबईत वाढती लोकसंख्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं वाढतं प्रदुषण. यावर मात्र सगळ्या बाजूनेच दुर्लक्ष आहे. यावरही सर्वेकरून त्याच्या अहवालावर काम करणं महत्त्वाचं आहे.
सर्वाधिक श्रीमंत शहरं
शहर संपत्ती (डॉलरमध्ये)
1.न्यूयॉर्क - 3 लाख कोटी
2.लंडन - 2.7 लाख कोटी
3.टोकियो - 2.5 लाख कोटी
4.सॅनफ्रान्सिस्को - 2.3 लाख कोटी
5.बिजिंग - 2.2 लाख कोटी
6.शांघाय - 2 लाख कोटी
7.लॉस एन्जेलिस - 1.4 लाख कोटी
8.हाँगकाँग - 1.5 लाख कोटी
9.सिडनी - 1 लाख कोटी
10.सिंगापूर - 1 लाख कोटी
11.शिकागो - 988 अब्ज
12.मुंबई - 950 अब्ज
13.टॉरोन्टो - 944 अब्ज
14.फ्रॅंकफर्ट - 912 अब्ज
15.पॅरिस - 860 अब्ज
अशाच नवीन माहिती साठी आपल्या ब्लॉगवर भेट द्या.

No comments