ऑटोमोबाईल उद्योग सध्या वेगाने वाढत आहे....


ज्यांना गाड्यांची, त्यांच्या तंत्रज्ञानाची आवड आहे त्यांच्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग हे क्षेत्र निश्चितच चांगले आहे.
टोमोबाईल उद्योग सध्या वेगाने वाढत आहे. त्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनीअरची मागणीही उद्योग क्षेत्रात मोठय़ाने होत असते. यामध्ये वाहन तयार करण्यात येणाऱ्या कंपनीपासून सर्व्हिस स्टेशन, इन्शुरन्स कंपनी, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या क्षेत्रातही करीअर करण्याचे मार्ग आहेत.
रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांची आवड असणारे विद्यार्थी ऑटोमोबाईल इंजिनीअर यामध्ये करीअर करू शकतात. दहावीनंतर डिप्लोमाही करता येतो. या विषयात बी.ई. किंवा बी.टेक करण्यासाठी गणित, भौतिक, रसायनशास्त्र आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयांसह १२वी उत्तीर्ण होण्याची आवश्यकता आहे. ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगचे विद्यार्थी एमई, एमटेक या पदव्याही प्राप्त करू शकतात. बीई किंवा बीटेक प्रवेशाकरिता आयआयटी, जेईई, एआयईईई बीटसेट या परीक्षांसाठी अखिल भारतीय किंवा राज्य परीक्षा द्यावी लागते.
वेतन
ऑटोमोबाईल इंजिनीअरला ट्रेनिंगदरम्यानच १५ ते २० हजार रुपये स्टायपेंड मिळण्यास मिळण्यास सुरुवात होते. नोकरीत पदोन्नती झाल्यास ३ ते ८ लाख वार्षिक उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. अनुभवी ऑटोमोबाईल इंजिनीअर वर्षाला २५ ते ३५ लाखही कमवू शकतो.
कौशल्य
ऑटोमोबाईल इंजिनीअर होण्याकरिता तंत्रज्ञानाच्या माहितीसह आर्थिक ज्ञानही असणे महत्त्वाचे आहे. कल्पकतेसह संवादाचेही उत्तम कौशल्य असणे आवश्यक आहे. शिवाय या क्षेत्रातील कायदेशीर बाबींचीही माहिती असावी. येथे कामाची वेळ जास्त असल्याने नियोजित वेळेपेक्षाही जास्त वेळ काम करावे लागते.
  • महाविद्यालये
  • हिंदुस्थान कॉलेज ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नोलॉजी, मथुरा
  • दिल्ली कॉलेज ऑफ टेलॉजी अँण्ज मॅनेजमेंट , पलवल
  • साबू सिद्दीक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, साबू सिद्दिक पॉलिटेक्निक रोड, भायखळा, मुंबई
  • इंडियन इन्स्टिट्यूट फॉर एरोनॉटिकल, शास्त्र कॅम्पस, एनडीए रोड, पुणे

No comments

Powered by Blogger.