पगारवाढ, घरेही स्वस्त! राज्य सरकार, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे मध्यमवर्गाला दिलासा...

 मुंबई:
     राज्यातही सातवा वेतन आयोग;पगार २५ टक्क्यांपर्यंत वाढणार.....

गेल्या वर्षी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लवकरच लागू केला जाईल अशी घोषणा केली होती.परंतु एक वर्ष होऊन गेले तरी सातवा वेतन आयोग लागू झाला नाही.सरकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलनेही केली.अखेर या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगासाठी तरतूद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी याची घोषणा केली. 

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ्याच्या ३२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले,केंद्राच्या सरंचनेनुसार व केंद्राने लागू केलेल्या दिनांकापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल आणि त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात येईल. 

मुख्यमंत्री म्हणाले,सातव्या वेतन आयोगासंबंधी बक्षी समितीचे काम सुरू असून बुधवारीच समितीने पोर्टल सुरू केले आहे.गुणवत्तापूर्ण कामासाठी वेतन आयोग महत्त्वाचा आहे.या पोर्टलवर अधिकारी महासंघाने माहिती भरावी.वेतन त्रुटी राहू नये याची दक्षता घ्यावी.
महासंघाच्या मागणीनुसार महागाई भत्ता फेब्रुवारीपासून रोखीने देण्यात येणार असून थकबाकीबाबत संघटनांशी चर्चा करून तो लाभही देण्यात येईल,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,शासन व प्रशासन लोकशाहीच्या रथाची दोन चाके असल्याने ही व्यवस्था चालवण्याची सामाजिक जबाबदारी शासन व अधिकारी कर्मचारी यांची आहे. महिला कर्मचाऱ्यांची बालसंगोपन रजेची मागणी लवकरच मंत्रिमंडळापुढे ठेवले जातील,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.